तिसऱ्या मसाला
साहित्य :-
1 किलो तिसऱ्या (शिंपली), अंदाजे 40–50 शिंपल्या
दीड कप बारीक चिरलेला कांदा
पाऊण कप ओलं खोबरं
दीड टीस्पून लाल तिखट
अर्धा टीस्पून हळद
1 हिरवी मिरची
2–3 आमसुलं
तेल
मीठ

कृती :-
1. तिसऱ्या स्वच्छ धुवून तासभर फिझर मध्ये ठेवा म्हणजे बाहेर काढल्यावर जरा वेळानी त्या आपोआपच उघडतील.
2. तिसऱ्या साफ करताना उघडलेल्या शिंपल्याची एक बाजू माष्टासकट तशीच ठेवा. दुसऱ्या बाजूला लागलेले माष्टं काढून घ्या आणि तो शिंपला फेकून द्या.
3. अर्धे शिंपले माष्टं पूर्ण काढून घेऊन फेकून द्या. काही वेळेला शिंपल्याच्या आतमध्ये छोटे खेकडे असतात ते काढून फेकून द्या.
4. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या. हळद, लाल तिखट घालून परता. मग साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या घालून परता आणि झाकण ठेऊन उकळी काढा.
5. ओलं खोबरं आणि आमसुलं घालून परता. शिंपले समुद्रातले असल्याने आधीच खरात असतात त्यामुळे मीठ बेतानेच घाला किंवा चव घेऊन घाला.
6. गरमागरम तिसऱ्या कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
non-v

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा