Welcome to my Maharashtrian - Marathi food world. Enjoy cooking Indian food, especially Maharashtrian, Konkani, malvani, Agri-Koli, Kolhapur, Puneri food recipes in Marathi.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

उपमा - Upma


उपमा
साहित्य:
१ वाटी रवा
२ वाटी पाणी
१ कांदा बारीक चिरुन
१/२ टोमॅटो चिरून
 पाव वाटी मटार - ऑपशनल
२ चमचे तेल
३ मिरच्या बारीक चिरुन
४-५ कढिपत्त्याची पाने
छोटा तुकडा किसलेले आले
१ छोटा चमचा उडीद डाळ
१ चमचा साखर
चिरलेली कोथिंबीर
लिंबूरस
फोडणीसाठी : अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा हिंग

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या,घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा आणि  टोमॅटोच्या ४-६ फोडी परतून घ्याव्या आणि त्यात मटार टाकावे.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. २ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ टाकावे. आणि चांगला उकळत ठेवावे.
५) उपमा व्यवस्थित शिजला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे. आणि आवड असल्यास वर बारीक शेव टाकून खाऊ शकता.
Breakfast
Share:

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

बटाटावडा - Batata Vada




बटाटावडा
साहित्य
अर्धा किलो बटाटे
४ हिरव्या मिरच्या
कढी पत्ता
२ चमचे मोठे कापलेली कोथींबीर
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
१ चमचा तेल
१ लिंबू
मीठ
१ कप बेसन
१/२ चमचा धणा पावडर
चिमुटभर सोडा
तळण्यासाठी तेल

कृती
बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.
एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका.
आता बटाटे मिसळून त्यात थोडं मीठ टाका. .
बटाट्याची भाजी थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा.
बेसन, एक चमचा गरम तेल, मीठ व थोडं पाणी टाकून बेसनाचं मिश्रण तयार करा .
जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा.
बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम-गरम वाढा.
खोबर्‍याची सुकी किंवा ओली चटणीसोबत चटपटीत तिखट वडापाव खाण्यास तयार...!
Share:

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

शेंगदाण्याची सोलापुरी चटणी - Solapuri Shengdana Chutney

शेंगदाण्याची सोलापुरी चटणी

साहित्य :-
भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल अर्धी वाटी

कृती:-
भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि पाव वाटी शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये दोन चारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून बाजूला ठेवावे. थोडी लसूण मिक्सर मध्ये टाका आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात पाव वाटी शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी. अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते.
टिप :-
या चटणीत खाताना दही घालून खावे
Share:

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

उकडीचे मोदक - Ukadiche Modak

उकडीचे मोदक

साहित्य:
१ मोठा नारळ
किसलेला गूळ
३ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकतो.

कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. ३ कप तांदूळ पिठासाठी ३ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे, काहीवेळा कालथ्याच्या अग्रभागाने मिक्स केल्यास पिठाचे गोळे राहतात. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे माध्यम आकाराचे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १५ मिनीटे वाफ काढावी.
गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
festival

Share:

मिरचीचा खर्डा - Mirchi Kharda

मिरचीचा खर्डा

साहित्य:
२०-२५ हिरव्या मिरच्या,
९ ते १० लसणीच्या पाकळ्या
१ चमचा मिठ
१ चमचा तेल

कृती:
१) मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत, लसूण सोलून घ्यावीत. पॅन गरम करण्यास ठेवावा. २-३ चमचे पाणी घालावे, मिरच्या आणि लसूण घालून मंद आचेवर साधारण ५ मिनीटे झाकण ठेवून वाफ काढावी.
२) वाफ काढली कि झाकण काढून मिरच्या-लसूण कोरडे करून घ्यावे. गार झाले कि मिठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यावे.
३) तेल गरम करून कुटलेला ठेचा थोडावेळ परतून घ्यावा.
              
Share:

मिरचीचे लोणचे - Green Chilly Pickle


मिरचीचे लोणचे

साहित्य
दीड किलो लांबट हिरवी मिरची
२ वाट्या मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
दोन चमचा हळद
एक चमचे हिंग
२ ते ३ वाट्या मीठ
१५ लिंबांचा रस
दीड  वाटी तेल

कृती
एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की परातीतल्या साहित्यावर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र करून मिक्स झाला की गार होऊ द्यावा.
मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे.  त्यात ५ चमचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्सर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी १५ लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.
Veg

Share:

सोलकढी - Solkadhi


सोलकढी

साहित्य:-
नारळाचे दूध ३ वाट्या,लसूण ३-४ पाकळ्या,कोकमाचे पाणी १/२ चमचे,हिरव्या मिरच्या दोन.
पूर्वतयारी:-
एक नारळ खवून घ्यावा. खवलेला नारळ, लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. वाटलेल्या मिश्रणाचे दूध काढावे.कोकमाचे आगळ तयार नसेल तर कोकम गरम पाण्यात उकळून घेऊन त्याचा रस काढावा.
कृती:-
नारळाचे दूध, कोकमाचे पाणी एकत्र करून त्यात सैंधव घालावे.अशाप्रकारे तुमची झटपट सोलकढी तयार होईल.
टीप:-ही सोलकढी गर्मीत लवकर खराब होऊ नये म्हणून कढीपत्ता आणि लसणीची फोडणी दिली तरी चालेल.सैंधव घातलेली ही सोलकढी अतिशय पाचक आणि चविष्ट तसेच थंड आहे.

veg
Share:

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

गुलाबजाम - Gulabjamun


गुलाबजाम

साहित्य:
अर्धा किलो  खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
तीन वाटी साखर
अडीच वाटी  पाणी
 वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तूप
२ चमचा मैदा
गरजेप्रमाणे दुध
बेकिंग सोडा

कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून त्यात मैदा आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करावे. त्यात थोडे दुध टाकून मळून घ्यावे.हाताला तूप लावून ते मळावे. ओल्यकपद्ा सुती क पड्यात हा गोळा झाकून ठेवावा.
२) तीन वाटी साखर, अडीच वाटी पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. व पाक तयार करून त्यात वेलचीपूड घालावी.
३) मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे तुमच्या आवडी प्रमाणे गोळे बनवावे. गोळ्यांना कुठेही चीर असता काम नये त्यामुळे तुपात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
४) तूप व्यवस्थित गरम करून गॅस मध्यम ठेवावी. तूप गरम झाल्यावर एक एक गोळा त्यात टाकावा. हे तरंगलेले गोळे हळुवारपणे झार्‍याने हलवावे. लालसर रंग आला कि तळलेले गोळे बाहेर काढावे. व थंड करत ठेवावे .
४)  पुन्हा दुसरे गुलाब जाम तळावेत, मग बाहेर काढावेत आणि तळलेली पहिले गुलाब जाम गरम पाकात सोडावे. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा. अश्या प्रकारे हि प्रोसेस करत राहावी.  गुलाबजाम पाकात किमान ४-५ तास मुरवावे. काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोझ इसेंस घालावा.
sweetdish
Share:

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

नारळी भात - Narali Bhat

नारळी भात

साहित्य -
१) दोन वाटी बासमती तांदूळ,
२) ४ वाटी पाणी,
३) ४  छोटे चमचा साजूक तूप,
४) २-३ लवंग,
५) वेलची पूड
६) २ वाटी किसलेला गूळ
७) २ वाटी खोवलेलं ओलं नारळ,
८) ८-१० काजू, १/२ वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.

कृती - तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून टाकावं. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवत ठेवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

नारळी पौर्णिमेला हा नारळी भात करण्याची पद्धत आहे.
festival  
Share:

ब्लॉग संग्रहण

Blogger द्वारे प्रायोजित.

Recent Posts

Unordered List

पेज

Theme Support