मिरचीचे लोणचे
साहित्य
दीड किलो लांबट हिरवी मिरची
२ वाट्या मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
दोन चमचा हळद
एक चमचे हिंग
२ ते ३ वाट्या मीठ
१५ लिंबांचा रस
दीड वाटी तेल
कृती
एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की परातीतल्या साहित्यावर ओतावे व झार्याने ढवळावे. मसाला एकत्र करून मिक्स झाला की गार होऊ द्यावा.
मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. त्यात ५ चमचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्सर्या किंवा तिसर्या दिवशी १५ लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.
Veg
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा