बासुंदी
साहित्य:
२ लिटर दुध
बदाम, पिस्ते, चारोळी, केशर
अर्धी वाटी साखर
वेलची पूड
कृती:
१) बदाम आणि पिस्ते सोलून पातळसर काप करावेत.
२) एका कढई मध्ये दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती पसरत चमच्याने मोडावी. आणि चमचा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जाणार नाही. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून चमच्याने हलवा. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
३) दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घाला. आधी पाव कप साखर घाला, चव पाहून झाल्यावर जास्त गोड हवी असेल तर अजून साखर घाला. आणि ५ ते १० मिनिटे उकळवा. गॅस बंद करून वेलची पूड घाला.
४) बासुंदी गार झाल्यावर फ्रीजमध्ये ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल. फ्रिज मधून बासुंदी काढल्यावर वर जाड साय आलेली दिसेल ती चमच्याने मोडून बासुंदीत मिसळा.
रात्री जेवून झाल्यावर स्वीट डिश म्हणून खाऊ शकता.
sweetdish
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा