केळ फुलाची भाजी
साहित्य : १ केळीच बोण्ड , १ वाटी चण्याची डाळ (उकळलेली), एक छोटा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, छोटा चमचा हळद, 1 कांदा, चवी प्रमाणे तिखट, कडी पत्ता तेल, मीठ.
कृती : सर्वप्रथम केळीच्या फुलांना स्वच्छ करून त्याची सालं काढून घ्यावी. वरचा कडक भाग काढून उरलेल्या भागाला स्वच्छ धुऊन बारीक चिरावे . एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं व कडीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यात बारीक
चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात उकळलेली चणा डाळ व केळीचे चिरलेला फुलं, मीठ, हळद व तिखट घालून १०-१५ मिनिट परतून घ्यावे. स्वादिष्ट भाजी तयार आहे.जेवते वेळी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा .
veg
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा