पावभाजी Pavbhaji
साहित्य:
१२ ते १५ पाव (लादीपाव)
दीड कप बारीक चिरलेला कांदा
२ ते अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो
६ मध्यम बटाटे (अंदाजे अर्धा किलो)
१२-१५ वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुरे
१/२ कप वाफवलेले मटार
३/४ ते १ कप सिमला मिरची, बारीक चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या (१ टेस्पून लसूण पेस्ट)
१ टिस्पून लाल तिखट
४ टेस्पून तेल (किंवा २ टेस्पून बटर + ३ टेस्पून तेल)
१/२ टिस्पून जिरे (ऐच्छिक)
२ टेस्पून पावभाजी मसाला
चवीनुसार मीठ
सर्व्ह करताना बटर, लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर
कृती :
१) चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात.
२) लसूण सोलून त्यात लाल तिखट घालावे. १ मोठा चमचा पाणी घालून मिकसरवर बारीक करावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम आचेवर तो शिजू द्यावा. नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी.
४) २-३ मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा. थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. चांगले मॅश करावे.
५) नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. वाढताना बटर घालावे. वरुन लिंबू पिळावे आणि कोथिंबीर पेरावी.
snacks
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा