अळुवडे
साहित्य:
अळू वड्यांसाठी असलेली अळूची पाने 5 किंवा 6
३/४ ते १ कप चणापिठ
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/४ कप चिंच (घट्टसर कोळ)
२ टेस्पून किसलेला गूळ
१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, एकेक टिस्पून धणे-जिरे पूड चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) चणापिठ, तांदूळ पिठ, चिंचेचा कोळ, गूळ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, १ चमचा तेल, चवीपुरते मिठ घालून मिश्रण घट्टसर करून घ्यावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ नसावे तसेच एकदम घट्ट सुद्धा नसावा. मिश्रण जरा चिकटसर होईल याची काळजी घ्यावी. अळूच्या पानावर मिश्रणाचा पातळ थर पसरवता येईल इतपत मिश्रण दाट असावे.
२) पाने धुवून फडक्याने पुसून घ्या देठ कापून टाका. पान उलटे ठेवून त्यावर लाटणे फिरवावे. पानावर मिश्रणाचा पातळ थर लावावा. त्यावर दुसरे पान तसेच उलटे ठेवून त्यावर मिश्रण लावावे. तिन्ही पाने तशीच करावीत. खालच्या बाजूकडून लहान बाजूला घट्ट गुंडाळी करावी. गुंडाळताना थोडे थोडे मिश्रण लावावे व मोदकाप्रमाणे वाफेवर उकडावेत.
गार झाले कि चकत्या कापून तळावेत किंवा शालो फ्राय करावेत आणि कोथिंबीर आणि सफेद तीळ थोडे वर पसरवून टाकावे.

Ocassional
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा