चायनिस भेळ
साहित्य:-
१०० ग्र्याम नूडल्स
१ बारीक लांब स्लाईस्ड कांदा
½ बारीक लांब स्लाईस्ड कोबी
१ स्लाईस्ड ढोबळी मिरची
१ चमचा सोया सॉस
१ चमचा vinegar
१ चमचा लाल चिल्ली सॉस
१ चमचा बारीक कुटून घेतलेले लसून
४-५ हिरव्या मिरच्या
½ चमचा कुटून घेतलेले अद्रक
मीठ चवीनुसार
१ चमचा black pepper powder
२ चमचे खाद्य तेल .
तेल नूडल्स टाळून घेण्यासाठी
सजावटी साठी
कांदा आणि कोथिंबीर
कृती:-
१. नूडल्स १० ते १५ मिनिट पाण्यात भिजवा , उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्या .
२. अर्धा चमचा तेल आणि मीठ उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स मध्ये टाका .
३. ह्या नूडल्सला वळवून घ्या , थोडे तेल टाकून एका सपाट प्लेट मध्ये ह्या नूडल्स थंड करा जेणे करून आपल्याला त्या तळून घेता येतील .
४. आता गरम तेला मध्ये ह्या नूडल्स तळून घ्या आणि त्यांचा भुगा करून घ्या . (जास्त बारीक करू नये ) आणि थोडा वेळ बाजूला ठेवा .
५. एका दुसर्या पात्रामध्ये तेल घ्या . त्यात थोडे अद्रक आणि लसुनची पेस्ट टाका . १/२ मिनिट तळून घ्या . आता त्यात कांदा , ढोबळी मिरची आणि कोबी टाका आणि २ मिनिट तळून घ्या .
६. आता या मध्ये vinegar, मीठ , pepper powder, सोया सॉस and लाल चिल्ली सॉस टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्.
७. तळलेल्या नूडल्स त्यात योग्य पद्धतीने मिसळा.(mix करा )
८. थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून भेलला सजवा
९. आकर्षक आणि लाजतदार चीनीज भेल तुमच्यासाठी तयार आहे.
snacks
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा