पुरणपोळी
साहित्य :-
३ वाट्या हरभरा डाळ
३ वाट्या चिरलेला गूळ
१ वाटी साखर
अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
३ वाट्या कणीक
३ टे.स्पून मैदा, चिमुटभर मीठ, पाऊन वाटी तेल, तांदळाची पिठी
कृती :-
हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी.
शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. ह्या पाण्याला पुरणाचा कट म्हणतात. पुरणपोळी बरोबर त्याचीच आमटी करतात. पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते.
डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. शिजवताना प्रथम पातळ होते व नंतर झाऱ्याला घट्ट लागू लागते.
पुरणयंत्राला बारीक जाळीची ताटली लावावी व शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
कणीक व मैदा चाळणीने चाळून घ्यावा व चिमुटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक सैलसर भिजवावी.
२ तास कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली तिंबावी. पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा. कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. तांदळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
पोळपाटावर पिठी घेवून हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.
festival

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा