फिरनी
साहित्य :-
१ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
४ वाट्या दूध
१ वाटी (भरून) साखर
२ चमचे चारोळ्या व काजूचे कप
१ चमचा बेदाणा
कृती :-
१) तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावे.
२) दुध तापत ठेवावे. साय काढू नये. दुध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.
३) आंग मध्यम ठेवावी व सतत ढवळत राहावे. अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.बोटाने कणी पहावी किंवा चाखून पाहावा.
४) रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.मिश्रण पुन्हा थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत गॅस वर ठेवावे व ढवळावे.
५) घट्ट होऊ लागले की शोभिवंत भांड्यात ओतावे त्यात वेलचीपूड किंवा एसेन्स घालावा.
६) गार झाले की चारोळ्या, काजू, बेदाणा घालावा. सुका मेवा नसला तरी चालेल.
फ्रीजमध्ये ठेवून थंड करावी व पुडिंग म्हणून जेवणानंतर लहान बॉलमधे द्यावी.
sweetdish
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा