बेसन भोपळी मिरची
साहित्य:
२ मोठ्या भोपळी मिरच्या
२ टेस्पून तेल
१/८ टिस्पून मोहरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ ते ३ कढीपत्ता
चवीपुरते मिठ
२ चिमटी साखर
४ ते ५ टेस्पून बेसन (आवडीनुसार कमी-जास्त)
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) भोपळी मिरची अर्धी कापून आतील बिया काढून टाकाव्यात. भोपळी मिरचीचे लहान चौकोनी तुकडे करावेत. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली भोपळी मिरची घालून परतावे. झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ वेळा वाफ काढावी. पाणी अजिबात घालू नये.
२) भोपळी मिरची थोडी शिजली कि मिठ, साखर घालून मिक्स करावे. एक चमचा बेसन पिठ पेरावे. मिक्स करून आवडीप्रमाणे पिठाचे प्रमाण वाढवावे. वाफेवर बेसन शिजू द्यावे. भाजी तयार झाली कि कोथिंबीर घालून ढवळावे आणि पोळीबरोबर गरमा गरम सर्व्ह करावे.
veg
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा