तंदुरी चिकन
साहित्य:
१ किलो चिकन
१ कापलेला कांदा
२ चमचे लिंबू रस
१ जुडी कोथिंबीर
२ चमचे लसुन पेस्ट
२ चमचे आल पेस्ट
२२५ ग्रॅम दही
२ चमचे मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
अर्धा चमचा वाटलेली मेथी
१ चमचा चाट मसाला
१ चमचा काळी मिरी वाटलेली
४-६ थेंब खायचा रंग
चवीनुसार मीठ
कृती:
प्रथम सर्व मसाले एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यावे.
त्या मध्येच मीठ व लाल रंग टाकून ८-१० मिनिटे फेटावे.
नंतर चिकनमध्ये सर्व मसाले व रंग टाकून चांगले फेटून घ्यावे.
सर्व मसाला चिकनला चांगला लागला पाहिजे.
नंतर रात्रभर चिकन मसाल्यात मुरु द्यावे.
मधून मधून चिकन हलवत राहावे.
मेरीनेटेड चिकन तंदूर मध्ये बेक करावे.
किवा ऒवन २२० डिग्री, ४२५° डिग्री.१० मिनिटे बेक करा.नंतर पलटवून ७ मिनिटे बेक करा.
तुकडे करून वा आवडीनुसार लिंबू व कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.
non-v
Wow Superr!! looks absolutely amazing.. beautiful pictures too.. �� thanks for sharing..
उत्तर द्याहटवा