खजूराची वडी
साहित्य :-
बिया काढलेला खजूर ३ वाट्या
३ चमचे तूप
२ चमचा खसखस
२ चमचा सुकं खोबरं
कृती :-
प्रथम खजूर चिरून घ्यावा. एका कढई मध्ये तूप घेऊन ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. त्या तुपात खसखस व खोबरं घालून अर्धा मिनिट परतावे व लगेचच खजूर घालावा. खजूर घातल्यावर सतत ढवळावे. खजूर अगदी मऊ होईपर्यंत शिजवावे व हे मिश्रण थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थोडे गार झाले की एका ताटलीला तूप लावावे. हाताला पण तूप लावून हे मिश्रण त्या ताटलीवर पसरावे. थोडेसे जाडसर पसरून घेतले की लगेचच त्याच्या वड्या पाडाव्यात. आवडत असल्यास या वड्यांना चांदीचा वर्ख लावावा किंवा वरून भाजलेली खसखस लावली. या वड्या थंडीमध्ये खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात .
Ocassional
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा