सुरणाचे काप
साहित्य:
अर्धा किलो सुरण
::::मॅरीनेशनसाठी::::
२ चमचे लिंबाचा रस
१ छोटा चमचा हळद
२ चमचे मालवणी मसाला
१ टिस्पून मीठ
::::रव्याचे मिश्रण::::
पाउण वाटी बारीक रवा
१ टचमचा जिरेपूड
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) सुरण हाताळण्यापूर्वी हाताला कोकम लावून घ्यावे. व सुरण सोलून घ्यावे आणि मोठे चौकोनी तुकडे करून काप करून घ्यावे. पाण्यात आमसूल घालून कोळून घ्यावे. या पाण्यात सुरण २ तास बुडवून ठेवावे.
२) मॅरीनेशनखाली दिलेले साहित्य एकत्र करावे (लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, आणि मीठ). लिंबाच्या रसाचे मिश्रण प्रत्येक कापावर चोळावे. एका ताटलीत काप वेगळे ठेवावे.
३) रवा, जिरेपूड, मालवणी मसाला , आणि मीठ एकत्र करून घ्यावे. काप रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावे. ३० मिनिटे तसेच ठेवून घ्यावे.
४) कापांवर पाण्याचा हात घेउन हलकेच चेपावे म्हणजे तळताना रवा तेलात सुटणार नाही.
५) तेल गरम करून तेलात सुरणाचे काप तळून घ्यावे. गरमच सर्व्ह करावे.
जेवताना सुरण तोंडी म्हणून घ्यावे..
snacks
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा