डाळ वडा
साहित्य:
१ वाटी चणाडाळ
३ ते ४ हिरव्या मिरच्या
७ ते ८ लसूण पाकळ्या
आले
कढीपत्ता पाने
१ छोटा चमचा हळद
१ चमचा जीरे
१/२ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
तेल तळण्यासाठी
चवीपुरते मिठ
कृती:
१) चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर ३ ते ४ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
२) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
४) कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा उडिद चटणी बरोबर खावं.
snacks
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा