दुधी हलवा
साहित्य:
पाऊण किलो कोवळा दुधी भोपळा (किंवा किसलेला दुधी अडीच कप)
२ टिस्पून साजूक तूप
दिड कप दुध
३/४ कप खवा (आवडत असल्यास थोडा जास्त घेतला तरी उत्तम)
३/४ कप साखर
१/४ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजू तुकडे, चारोळ्या बेदाणे आवडीनुसार
कृती:
१) दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे. हे पाणी आमटी मध्ये वापरता येईल.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
३) दुध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दुध घालावे. खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर कालथ्याने फोडाव्यात.
४) खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो
sweetdish
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा