बोंबील फ्राय
साहित्य : 10-12 बोंबील, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट, मीठ, तांदळाचा बारीक रवा, तेल.
कृती : सर्वप्रथम बोंबील डोक्याकडून कापू घ्यावा.नंतर एक बोंबलाचे दोन तुकडे करून घ्यावे . धुऊन मीठ लावून ठेवावा. नंतर एक जाड पिशवीमध्ये ठेवून त्यावर पाटा किंवा वजनदार वस्तू १ -२ तास ठेवून सर्व पाणी काढून टाकावे. त्यास हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबिलाला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावे व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावा.
non-v
non-v
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा