उपमा
साहित्य:
१ वाटी रवा
२ वाटी पाणी
१ कांदा बारीक चिरुन
१/२ टोमॅटो चिरून
पाव वाटी मटार - ऑपशनल
२ चमचे तेल
३ मिरच्या बारीक चिरुन
४-५ कढिपत्त्याची पाने
छोटा तुकडा किसलेले आले
१ छोटा चमचा उडीद डाळ
१ चमचा साखर
चिरलेली कोथिंबीर
लिंबूरस
फोडणीसाठी : अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा हिंग
कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या,घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा आणि टोमॅटोच्या ४-६ फोडी परतून घ्याव्या आणि त्यात मटार टाकावे.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. २ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ टाकावे. आणि चांगला उकळत ठेवावे.
५) उपमा व्यवस्थित शिजला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे. आणि आवड असल्यास वर बारीक शेव टाकून खाऊ शकता.
Breakfast
thanks for make it
उत्तर द्याहटवाhotel job
फार छान 👍👌💐
उत्तर द्याहटवा