सुका जवळा
साहित्य -: सुका जवळा
तेल, कांदा, गरम मसाला, २-४ कोकमं, मीठ चवीप्रमाणे.
कृती-:
दोन माणसांकरता.
बाजारातून छानपैकी तीन वाटे सुका जवळा आणावा. थोडा निवडावा. काही खडेबिडे असतील तर काढून टाकावेत. नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे.
पातेल्यात तेल घेऊन झकासपैकी कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतून घ्यावा व त्यात सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा. नंतर त्यात आमसूल, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकवार परतावे व सारखे करून घ्यावे.
जवळा तांदळाच्या भाकरीसोबत खावा, फारच छान लागतो
non-v
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा