गुलाबजाम
साहित्य:
अर्धा किलो खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
तीन वाटी साखर
अडीच वाटी पाणी
वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तूप
२ चमचा मैदा
गरजेप्रमाणे दुध
बेकिंग सोडा
कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून त्यात मैदा आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करावे. त्यात थोडे दुध टाकून मळून घ्यावे.हाताला तूप लावून ते मळावे. ओल्यकपद्ा सुती क पड्यात हा गोळा झाकून ठेवावा.
२) तीन वाटी साखर, अडीच वाटी पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. व पाक तयार करून त्यात वेलचीपूड घालावी.
३) मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे तुमच्या आवडी प्रमाणे गोळे बनवावे. गोळ्यांना कुठेही चीर असता काम नये त्यामुळे तुपात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
४) तूप व्यवस्थित गरम करून गॅस मध्यम ठेवावी. तूप गरम झाल्यावर एक एक गोळा त्यात टाकावा. हे तरंगलेले गोळे हळुवारपणे झार्याने हलवावे. लालसर रंग आला कि तळलेले गोळे बाहेर काढावे. व थंड करत ठेवावे .
४) पुन्हा दुसरे गुलाब जाम तळावेत, मग बाहेर काढावेत आणि तळलेली पहिले गुलाब जाम गरम पाकात सोडावे. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा. अश्या प्रकारे हि प्रोसेस करत राहावी. गुलाबजाम पाकात किमान ४-५ तास मुरवावे. काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोझ इसेंस घालावा.
sweetdish
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा