सुके मटण
साहित्य : १ किलो मटण, ५-६ मोठे कांदे, २ टोमॅटो, ३ टीस्पून मिरची पावडर, १+१/२ टीस्पून गरम मसाला,
१+१/२ टीस्पून मीठ, कोथिंबीर, ४ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून भाजलेले सुके खोबरे-कूट
वाटण मसाला : २ इंच आले, २० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या
फोडणी : २-३ तमालपत्रे, २ मसाला वेलची, २ तुकडे दालचिनी, २-३ लवंगा
कृती : मटण धुवून मटणाला हळद, मिरची पावडर, वाटलेला मसाला व थोडे मीठ लावून अर्धा तास ठेवावे.
पातेलीत तेल चांगले तापल्यावर फोडणीचे मसाले घालावेत. त्यावर कांदा बारीक चिरून घालावा व गुलाबी
रंगावर परतावा. नंतर त्यावर टोमॅटो चिरून घालावा व चांगला परतावा. त्यावर मसाला लावलेले मटण
घालून परतावे व मंद गॅसवर वाफेवर शिजू ध्यावे.
मटण शिजल्यावर त्यात मीठ, खोबऱ्याचे कूट व कोथिंबीर चिरून घालावी व चांगले शिजवावे.
मटण सुके करून गॅस बंद करावा.
non-v
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा