ताक
साहित्य:
१/२ कप दही
१ कप पाणी
१ टेस्पून कोथिंबीर
२ चिरलेली पुदीना पाने
१/४ टिस्पून जिरे
चवीनुसार मिठ
कृती:
१) प्रथम दही रवीने घोटून घ्यावे. मग त्यात पाणी घालून घुसळून घ्यावे.
२) खलबत्त्यात घालून जिरे भरडसर कुटून घ्यावे. कुटलेले जिरे घुसळलेल्या ताकात घालावे.
३) एका वाटीत १ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली पुदीना पाने घ्यावीत. त्यात २ चिमटी मिठ घालून कुस्करून घ्यावे, म्हणजे मठ्ठा पिताना त्याची पाने तोंडात येणार नाहीत. हि कुस्करलेली कोथिंबीर व पुदीना पाने मठ्ठ्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे.
सर्व एकत्र ढवळून जेवणानंतर सर्व्ह करावे.
veg
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा