सावजी मटन (स्पेशल नागपुर)
साहित्य :- मटण १ किलो
सुके खोबरे १ १/२ वाटी किसुन
तिळ्,जीरे,खसखस्,काळा मसाला, प्रत्येकी २ चमचे
धणे १/४ वाटी
लवग ४
वेलदोडे ४
मिरे ६-७
दालचिनी २
तमालपत्र २
हळ्द १ १/२ चमचा
लाल तीखट आवडीनुसार (१/३ वाटी)
आल्-लशुण पेस्ट १/४ वाटी
कांदे ६+२
कोथिबीर १ जुडी
कच्चि पपई पेस्ट २ चमचे
मिट चवी प्रमाणे
तेल २ वाटया
कृती :- आधी मटण धुवुन निथळ ठेवावे व त्याला १/२ आले लसुण पेस्ट लावुन १/२ तास राहु द्या
खोबरे,तिळ्,खस्-खस्,जिरे,धणे,गरम मसाल्याचे सर्व पदार्थ कोरडे भाजुन घ्यावे आणी १/४ कोथिबिर घालुन वाटावे
६कान्दा बारीक चिरुन घ्यावा,थोड्या तेलावर लालसर परतवा आणी बारिक करा
कोथिबिर चिरुन घ्या
मट्ण कुकरला लावुन पाणी घालुन ३ शिट्या होउ द्या
तेल तापवुन त्यात तमालपत्र घाला,२ बारिक चिरलेले कांदे घाला बदामी होउ द्या
१/४ चिरलेलि कोथिबिर घाला
वाट्लेले कांदे घाला ५ मि परता
खोबरयाचे वाट्ण घाला आणी तेल सुटु द्या
तीखट्,हळ्द,काळा मसाला घाला
छान तेल सुट्ले कि मट्णाचे पीसेस घाला व १० मि परता
शिजवलेल्या मट्णाचे पाणी घाला आणी वर गरजेनुसार पाणी घाला
मिठ घाला
२-३ उकळी येउ द्या
वर बारीक कोथिबिर घाला
गरमा गरम भाकरी सोबत खायला
non-v
i like this sir thanks for making this i love it
उत्तर द्याहटवाhindi recipes