Welcome to my Maharashtrian - Marathi food world. Enjoy cooking Indian food, especially Maharashtrian, Konkani, malvani, Agri-Koli, Kolhapur, Puneri food recipes in Marathi.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

उपमा - Upma


उपमा
साहित्य:
१ वाटी रवा
२ वाटी पाणी
१ कांदा बारीक चिरुन
१/२ टोमॅटो चिरून
 पाव वाटी मटार - ऑपशनल
२ चमचे तेल
३ मिरच्या बारीक चिरुन
४-५ कढिपत्त्याची पाने
छोटा तुकडा किसलेले आले
१ छोटा चमचा उडीद डाळ
१ चमचा साखर
चिरलेली कोथिंबीर
लिंबूरस
फोडणीसाठी : अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा हिंग

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या,घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा आणि  टोमॅटोच्या ४-६ फोडी परतून घ्याव्या आणि त्यात मटार टाकावे.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. २ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ टाकावे. आणि चांगला उकळत ठेवावे.
५) उपमा व्यवस्थित शिजला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे. आणि आवड असल्यास वर बारीक शेव टाकून खाऊ शकता.
Breakfast
Share:

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

बटाटावडा - Batata Vada




बटाटावडा
साहित्य
अर्धा किलो बटाटे
४ हिरव्या मिरच्या
कढी पत्ता
२ चमचे मोठे कापलेली कोथींबीर
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
१ चमचा तेल
१ लिंबू
मीठ
१ कप बेसन
१/२ चमचा धणा पावडर
चिमुटभर सोडा
तळण्यासाठी तेल

कृती
बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.
एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका.
आता बटाटे मिसळून त्यात थोडं मीठ टाका. .
बटाट्याची भाजी थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा.
बेसन, एक चमचा गरम तेल, मीठ व थोडं पाणी टाकून बेसनाचं मिश्रण तयार करा .
जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा.
बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम-गरम वाढा.
खोबर्‍याची सुकी किंवा ओली चटणीसोबत चटपटीत तिखट वडापाव खाण्यास तयार...!
Share:

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

शेंगदाण्याची सोलापुरी चटणी - Solapuri Shengdana Chutney

शेंगदाण्याची सोलापुरी चटणी

साहित्य :-
भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल अर्धी वाटी

कृती:-
भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि पाव वाटी शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये दोन चारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून बाजूला ठेवावे. थोडी लसूण मिक्सर मध्ये टाका आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात पाव वाटी शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी. अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते.
टिप :-
या चटणीत खाताना दही घालून खावे
Share:

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

उकडीचे मोदक - Ukadiche Modak

उकडीचे मोदक

साहित्य:
१ मोठा नारळ
किसलेला गूळ
३ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकतो.

कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. ३ कप तांदूळ पिठासाठी ३ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे, काहीवेळा कालथ्याच्या अग्रभागाने मिक्स केल्यास पिठाचे गोळे राहतात. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे माध्यम आकाराचे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १५ मिनीटे वाफ काढावी.
गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
festival

Share:

मिरचीचा खर्डा - Mirchi Kharda

मिरचीचा खर्डा

साहित्य:
२०-२५ हिरव्या मिरच्या,
९ ते १० लसणीच्या पाकळ्या
१ चमचा मिठ
१ चमचा तेल

कृती:
१) मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत, लसूण सोलून घ्यावीत. पॅन गरम करण्यास ठेवावा. २-३ चमचे पाणी घालावे, मिरच्या आणि लसूण घालून मंद आचेवर साधारण ५ मिनीटे झाकण ठेवून वाफ काढावी.
२) वाफ काढली कि झाकण काढून मिरच्या-लसूण कोरडे करून घ्यावे. गार झाले कि मिठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यावे.
३) तेल गरम करून कुटलेला ठेचा थोडावेळ परतून घ्यावा.
              
Share:

मिरचीचे लोणचे - Green Chilly Pickle


मिरचीचे लोणचे

साहित्य
दीड किलो लांबट हिरवी मिरची
२ वाट्या मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
दोन चमचा हळद
एक चमचे हिंग
२ ते ३ वाट्या मीठ
१५ लिंबांचा रस
दीड  वाटी तेल

कृती
एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की परातीतल्या साहित्यावर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र करून मिक्स झाला की गार होऊ द्यावा.
मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे.  त्यात ५ चमचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्सर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी १५ लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.
Veg

Share:

सोलकढी - Solkadhi


सोलकढी

साहित्य:-
नारळाचे दूध ३ वाट्या,लसूण ३-४ पाकळ्या,कोकमाचे पाणी १/२ चमचे,हिरव्या मिरच्या दोन.
पूर्वतयारी:-
एक नारळ खवून घ्यावा. खवलेला नारळ, लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. वाटलेल्या मिश्रणाचे दूध काढावे.कोकमाचे आगळ तयार नसेल तर कोकम गरम पाण्यात उकळून घेऊन त्याचा रस काढावा.
कृती:-
नारळाचे दूध, कोकमाचे पाणी एकत्र करून त्यात सैंधव घालावे.अशाप्रकारे तुमची झटपट सोलकढी तयार होईल.
टीप:-ही सोलकढी गर्मीत लवकर खराब होऊ नये म्हणून कढीपत्ता आणि लसणीची फोडणी दिली तरी चालेल.सैंधव घातलेली ही सोलकढी अतिशय पाचक आणि चविष्ट तसेच थंड आहे.

veg
Share:

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

गुलाबजाम - Gulabjamun


गुलाबजाम

साहित्य:
अर्धा किलो  खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
तीन वाटी साखर
अडीच वाटी  पाणी
 वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तूप
२ चमचा मैदा
गरजेप्रमाणे दुध
बेकिंग सोडा

कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून त्यात मैदा आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करावे. त्यात थोडे दुध टाकून मळून घ्यावे.हाताला तूप लावून ते मळावे. ओल्यकपद्ा सुती क पड्यात हा गोळा झाकून ठेवावा.
२) तीन वाटी साखर, अडीच वाटी पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. व पाक तयार करून त्यात वेलचीपूड घालावी.
३) मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे तुमच्या आवडी प्रमाणे गोळे बनवावे. गोळ्यांना कुठेही चीर असता काम नये त्यामुळे तुपात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
४) तूप व्यवस्थित गरम करून गॅस मध्यम ठेवावी. तूप गरम झाल्यावर एक एक गोळा त्यात टाकावा. हे तरंगलेले गोळे हळुवारपणे झार्‍याने हलवावे. लालसर रंग आला कि तळलेले गोळे बाहेर काढावे. व थंड करत ठेवावे .
४)  पुन्हा दुसरे गुलाब जाम तळावेत, मग बाहेर काढावेत आणि तळलेली पहिले गुलाब जाम गरम पाकात सोडावे. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा. अश्या प्रकारे हि प्रोसेस करत राहावी.  गुलाबजाम पाकात किमान ४-५ तास मुरवावे. काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोझ इसेंस घालावा.
sweetdish
Share:

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

नारळी भात - Narali Bhat

नारळी भात

साहित्य -
१) दोन वाटी बासमती तांदूळ,
२) ४ वाटी पाणी,
३) ४  छोटे चमचा साजूक तूप,
४) २-३ लवंग,
५) वेलची पूड
६) २ वाटी किसलेला गूळ
७) २ वाटी खोवलेलं ओलं नारळ,
८) ८-१० काजू, १/२ वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.

कृती - तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून टाकावं. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवत ठेवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

नारळी पौर्णिमेला हा नारळी भात करण्याची पद्धत आहे.
festival  
Share:

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

नानकटाई - NanKatai


नानकटाई
साहित्य :-
१/३ कप मैदा
१/३ कप रवा
अर्धा कप बेसन
चिमूटभर बेकिंग सोडा
अर्धा चमचा वेलची पूड
अर्धा चमचा जायफळ पूड
अर्धा कप लोणी
२/३ कप साखर
कापलेले बदाम आणि पिस्ते
कृती :-
प्रथम लोणी फ्रीज मधून काढून ठेवावे व ते मऊ होऊ द्यावे. या मऊ झालेल्या लोण्यामध्ये साखर घालून दोन्ही एकत्र एक ५ मिनिटे फेटावे. बदाम व पिस्ते सोडून इतर सर्व कोरडे पदार्थ एकत्र करावेत. लोणी आणि साखरेच्या मिश्रणात हे कोरडे जिन्नस घालून छान गोळा मळून घ्यावा. या गोळ्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून त्यावर बदाम व पिस्ते लावावेत. ओवन ३५० ला प्रीहीट करावा व एका बेकिंग ट्रे वर हे गोळे थोड्या थोड्या अंतरावर ठेवावेत. मध्ये ३५० ला १० - १५ मिनिटे बेक करावेत. खुसखुशीत नानकटाई तयार.या प्रमाणामध्ये २० ते २२ नानखटाई होतील.
Ocassional
Share:

खजूराची वडी - Khajur Vadi



खजूराची वडी

साहित्य :-
बिया काढलेला खजूर ३ वाट्या
३ चमचे तूप
२ चमचा खसखस
२ चमचा सुकं खोबरं

कृती :-
प्रथम खजूर चिरून घ्यावा. एका कढई मध्ये तूप घेऊन ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. त्या तुपात खसखस व खोबरं घालून अर्धा मिनिट परतावे व लगेचच खजूर घालावा. खजूर घातल्यावर सतत ढवळावे. खजूर अगदी मऊ होईपर्यंत शिजवावे व हे मिश्रण थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थोडे गार झाले की एका ताटलीला तूप लावावे. हाताला पण तूप लावून हे मिश्रण त्या ताटलीवर पसरावे. थोडेसे जाडसर पसरून घेतले की लगेचच त्याच्या वड्या पाडाव्यात. आवडत असल्यास या वड्यांना चांदीचा वर्ख लावावा किंवा वरून भाजलेली खसखस लावली. या वड्या थंडीमध्ये खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात .

Ocassional
Share:

फिरनी - Firni


फिरनी

साहित्य :-
१ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
४ वाट्या दूध
१ वाटी (भरून) साखर
२ चमचे चारोळ्या व काजूचे कप
१ चमचा बेदाणा

कृती :-
१) तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावे.
२) दुध तापत ठेवावे. साय काढू नये. दुध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.
३) आंग  मध्यम ठेवावी व सतत ढवळत राहावे. अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.बोटाने कणी पहावी किंवा चाखून पाहावा.
४) रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.मिश्रण पुन्हा थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत गॅस वर ठेवावे व ढवळावे.
५) घट्ट होऊ लागले की शोभिवंत भांड्यात ओतावे त्यात वेलचीपूड किंवा एसेन्स घालावा.
६) गार झाले की चारोळ्या, काजू, बेदाणा घालावा. सुका मेवा नसला तरी चालेल.
    फ्रीजमध्ये ठेवून थंड करावी व पुडिंग म्हणून जेवणानंतर लहान बॉलमधे द्यावी.

sweetdish
Share:

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

केळ फुलाची भाजी - Kel Fhulachi Bhaji


केळ फुलाची भाजी

साहित्य : १ केळीच बोण्ड , १ वाटी चण्याची डाळ (उकळलेली), एक छोटा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, छोटा चमचा हळद, 1 कांदा, चवी प्रमाणे  तिखट, कडी पत्ता तेल, मीठ.

कृती : सर्वप्रथम केळीच्या फुलांना स्वच्छ करून त्याची सालं काढून घ्यावी. वरचा कडक भाग काढून उरलेल्या भागाला स्वच्छ धुऊन बारीक चिरावे . एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं व कडीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यात बारीक
चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. नंतर त्यात उकळलेली चणा डाळ व केळीचे चिरलेला फुलं, मीठ, हळद व तिखट घालून १०-१५  मिनिट परतून घ्यावे. स्वादिष्ट भाजी तयार आहे.जेवते वेळी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा .
veg
Share:

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

सुरणाचे काप - Surnache Kap


सुरणाचे काप

साहित्य:
अर्धा  किलो सुरण
::::मॅरीनेशनसाठी::::
२ चमचे लिंबाचा रस
१ छोटा चमचा हळद
२ चमचे मालवणी मसाला
१ टिस्पून मीठ
::::रव्याचे मिश्रण::::
पाउण वाटी बारीक रवा
१ टचमचा  जिरेपूड
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) सुरण हाताळण्यापूर्वी हाताला कोकम लावून घ्यावे. व सुरण सोलून घ्यावे आणि मोठे चौकोनी तुकडे करून काप करून घ्यावे. पाण्यात आमसूल घालून कोळून घ्यावे. या पाण्यात सुरण २ तास बुडवून ठेवावे.
२) मॅरीनेशनखाली दिलेले साहित्य एकत्र करावे (लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, आणि मीठ). लिंबाच्या रसाचे मिश्रण प्रत्येक कापावर चोळावे. एका ताटलीत काप वेगळे  ठेवावे.
३) रवा, जिरेपूड, मालवणी मसाला , आणि मीठ एकत्र करून घ्यावे. काप रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावे. ३० मिनिटे तसेच ठेवून घ्यावे.
४) कापांवर पाण्याचा  हात घेउन हलकेच चेपावे म्हणजे तळताना रवा तेलात सुटणार नाही.
५) तेल गरम करून तेलात सुरणाचे काप तळून घ्यावे. गरमच सर्व्ह करावे.
     जेवताना सुरण तोंडी म्हणून घ्यावे..
snacks
Share:

डाळ वडा - Dal Vada



डाळ वडा 

साहित्य:
१ वाटी चणाडाळ
३ ते ४ हिरव्या मिरच्या
७ ते ८ लसूण पाकळ्या
आले
 कढीपत्ता पाने
१ छोटा चमचा हळद 
१ चमचा जीरे
१/२ वाटी  कोथिंबीर, बारीक चिरून
तेल तळण्यासाठी
चवीपुरते मिठ
कृती:
१) चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर ३ ते ४ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
२) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
४) कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा उडिद चटणी बरोबर खावं. 
snacks
Share:

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

बासुंदी - Basundi


बासुंदी

साहित्य:
२ लिटर दुध
बदाम, पिस्ते, चारोळी, केशर
अर्धी वाटी  साखर
वेलची पूड

कृती:
१) बदाम आणि पिस्ते सोलून पातळसर काप करावेत.
२) एका  कढई मध्ये  दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती पसरत चमच्याने  मोडावी. आणि चमचा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जाणार नाही. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून चमच्याने  हलवा. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
३) दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घाला. आधी पाव कप साखर घाला, चव पाहून झाल्यावर जास्त गोड  हवी असेल तर अजून साखर घाला. आणि ५ ते १०  मिनिटे उकळवा. गॅस बंद करून वेलची पूड घाला.
४) बासुंदी गार झाल्यावर फ्रीजमध्ये  ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल. फ्रिज मधून बासुंदी काढल्यावर वर जाड साय आलेली दिसेल ती चमच्याने मोडून बासुंदीत मिसळा.

रात्री जेवून झाल्यावर स्वीट डिश म्हणून खाऊ शकता.

sweetdish


Share:

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

दुधी हलवा - Dudhi Halwa


दुधी हलवा 

साहित्य:
पाऊण किलो कोवळा दुधी भोपळा (किंवा किसलेला दुधी अडीच कप)
२ टिस्पून साजूक तूप
दिड कप दुध
३/४ कप खवा (आवडत असल्यास थोडा जास्त घेतला तरी उत्तम)
३/४ कप साखर
१/४ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजू तुकडे, चारोळ्या बेदाणे आवडीनुसार

कृती:
१) दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे. हे पाणी आमटी मध्ये वापरता येईल.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
३) दुध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दुध घालावे. खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर कालथ्याने फोडाव्यात.
४) खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो

sweetdish
Share:

मेथी मटार मलाई - Methi Matter Malai




मेथी मटार मलाई
साहित्य:
३ कप मेथीची फक्त पाने
१/२ कप मटार
६ हिरव्या मिरच्या
१/२ कप भाजलेल्या कांद्या टोमॅटोची पेस्ट
१ टेस्पून बटर किंवा साजूक तुप
२ काळ्या मिरी
१ वेलची
१ लहान दालचिनीची काडी
१/२ कप दुध
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर
२ टिस्पून तीळ कुट
२ टिस्पून काजू मगज पेस्ट
१ टिस्पून धणे जीरे पुड
२ टिस्पून fresh cream
कृती:
१) कढईत तूप गरम करावे त्यात हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे. नंतर मिरी, वेलची आणि दालचिनीची काडी घालून त्यांचा छान वास येईस्तोवर परतावे.नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर परतावा.
२) या फोडणीत आललसूण पेस्ट घालावी. मध्यम आचेवर परतावे. त्यात मटार परतावे. नंतर मेथीची पाने चिरून घालावीत. मध्यम आचेवर मेथी परतावी. शिजवताना कढईवर झाकण ठेवू नये, मेथीचा रंग बदलतो.
३) पाने थोडी शिजली कि त्यात कांद्या टोमॅटो ची पेस्ट घालावी आणि मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मिठ व साखर घाला आणि छान परता.
४) काजूमगज पेस्ट घाला.धणेजीरे पूड घालून परता. नंतर१ ते २ टेस्पून क्रिम घालावे आणि थोडावेळ मंद आचेवर शिजवावे.

 veg
Share:

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

टोमॅटोची भाजी - Tomato Bhaji



टोमॅटोची भाजी 


साहित्य:
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप चिरलेला कांदा
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: पाव चमचे जिरे, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद, २-३ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
अर्धा चमचा आले पेस्ट
चमचा गुळ
चवीनुसार मिठ
कोथिंबीर

कृती:
कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. आले पेस्ट घालून काही सेकंद परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा. थोडे मिठ घालून कांदा परतून घ्यावा.
कांदा निट शिजला कि त्यात चिरलेला टोमॅटो घालून ढवळावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून टोमॅटो शिजू द्यावा. टोमॅटो अर्धवट शिजला कि त्यात गूळ घालावा. निट मिक्स करून टोमॅटो शिजू द्यावा. गरजेनुसार मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
veg
Share:

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

वांग्याची भजी - Wangyachi Bhaji


वांग्याची भजी

साहित्य:
१ वांगे
1/२ कप बेसन पिठ
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून हळद
१ टिस्पून तिखट
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) वांग्याचे गोल पातळ काप करावे. मिठाच्या पाण्यात काप १० मिनीटे घालावेत.
२) बेसन पिठात पाणी घालून गुठळ्या न होता नेहमी बटाटे वड्याला जितके घट्ट भिजवतो त्यापेक्षा थोडे पातळ भिजवावे, ज्यामुळे वांग्याच्या कापांना बेसनाचे कमी आवरण होईल आणि थोडा कुरकूरीतपणा येईल.
३) बेसनाच्या पिठात तांदूळ पिठ, लाल तिखट, जिरे, मिठ, हळद घालावे. जर उपलब्ध असेल तर थोडा ओवा, चिरलेली कोथिंबीर घालावी.
४) कढईत तेल गरम करावे. बेसन पिठात वांग्याचे काप बुडवून तळून काढावेत. हिरवी चटणी किंवा लसणीच्या चटणीबरोबर गरम गरम भजी खावी.

veg


Share:

मश्रुम मसाला - Mashroom Masala


मश्रुम मसाला 

साहित्य:
१५० ग्राम बटण मश्रुम
३ मध्यम कांदे, किसून
३ लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून
६ ते ७ काजू पाकळ्या
४ ते ५ लसूण पाकळ्या, ठेचून
१ टिस्पून किसलेले आले
२ टेस्पून तेल
१ टिस्पून जिरे
१ टेस्पून धणेजिरेपूड
१ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) मश्रुम स्वच्छ धुवून घ्यावेत. जर मश्रुम मोठे असतील तर दोन तुकडे करावेत.
२) तेल गरम करून त्यात जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आले-लसूण घालावे. त्यात किसलेले कांदे घालून परतावे. काजू घालावेत. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावे. मध्यम आचेवर तेल सुटेस्तोवर परतावे. मीठ, धणेजिरेपूड आणि गरम मसाला घालून मिक्स करावे.
३) त्यात मश्रुम घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. साधारण २० ते २५ मिनीटे वाफ काढावी.
मश्रुम शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालून सजवावे.

veg
Share:

भरलेली वांगी - Bharlela Wanga

भरलेली वांगी 

साहित्य :

१) ४-५ मध्यम आकाराची वांगी 
२) २ मोठे कांदे
३) २ टोमॅटो
४) ३-४ चमचे शेंगदाण्याचे कूट
५) २ छोटे चमचे मालवणी मसाला
६) १/२ छोटा चमचा जिरे व धणे पूड
७) तेल
८) हळद
९) कोथिंबीर
१०) आवडीनुसार मीठ

कृती :

टोमॅटो व कांदा चिरून त्यात धणे जिरे पूड, शेंगदाण्याच कूट, मालवणी मसाला, हळद व मीठ घालून हे मिश्रण मिक्सला लावून सारण करून घ्यावे व बाजूला करून ठेवावे.

वांगी स्वच्छ धवून घ्यावी. देठांना जर काटे असतील तर काढून टाकावे.

वांग्यांना मधून चार काप दयावे. पूर्ण फोडी करू नये कारण त्यात सारण भरायचे आहे.
सारण वांग्यात भरावे.

एका भांडयात तेल गरम करावे. एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी.

थोडीशी लालसर भाजून घ्यावी. वरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे.

थोडेसे पाणी घालावे. मध्येमध्ये वांगी परतत राहावी.

मंद ग्यासवर शिजू दयावे.

वरून झाकण ठेवावे, या झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात.

हे पाणी वांग्यात घालावे.

वांगी शिजली कि वरून छान कोथिंबीर घालावी.

भरलेली वांगी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाण्यास घ्यावी.

veg
Share:

भरलेलं पापलेट - Bharlela Paplet


भरलेलं पापलेट 

साहित्यः२ मध्यम आकाराची पापलेट,
१/२ नारळाचा चव,
३ हिरव्या मिरच्या,
पाव चमचा हळद,
१० लसूण पाकळ्या,
थोडेसे आले,थोडासा पुदिना
१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,
१/२ लिंबाचा रस,
१/२ वाटी तांद्ळाचे पीठ,तेल.
कृती:
पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.
वरूनही आड्व्या चिर्‍या द्याव्यात.
खोबरं ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.
हल्क्या हाताने पापलेट तांदळाच्या पिठात घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.

non-v
Share:

बांगडा फ्राय - Bangda Fry


बांगडा फ्राय 

साहित्य:

1. ४ बांगडे 
2. तिखट, मीठ, हळद
3. ३ टेबलस्पून बारीक रवा
4. २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
5. २ टेबलस्पून कोकमाचे आगळ
6. तेल

कृती:
1. प्रथम बांगडा साफ करून धुवून घ्या. नंतर बांगड्याला सुरीने आडव्या चिरा द्या. नंतर कोकमाचे आगळ, १ चमचा तिखट, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून बांगडयास १५ मिनिटे लावून ठेवावे.
2. नंतर बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद, २ टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून बांगडयास लावून, बांगडे नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे Shallow फ्राय करून घ्यावेत.

non-v
Share:

कांदा भजी - Kanda Bhaji


कांदा भजी-Kanda Bhaji 

साहित्य:
१ मोठा कांदा
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून तांदळाचं पीठ
कांद्यात मावेल तितके बेसन अंदाजे ३ टेबलस्पून बेसन
तळण्यासाठी तेल

कृती:
१. कांदा उभा आणि पात्तळ चिरा.
२.त्यात मीठ - साखर,हळद तिखट ,बेसन आणि तांदळाचे पीठ घालून हाताने मिक्स करा.
३. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि १ चमचा गरम तेल मिश्रणात घाला.गॅस बारीक करा.१ टेबलस्पून मापाने थोडे थोडे मिश्रण कढईत अंतरा-अंतरावर सोडा. मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भजी तळा.
४. भजी बरोबर आवडीप्रमाणे लसणीची सुकी चटणी किंवा टोमॅटो केचप द्या.


snacks
Share:

शेजवान सॉस - Schezwan Sauce


शेजवान सॉस - Schezwan Sauce

साहित्य:
१० लाल सुकया मिरच्या
१ टेस्पून लसूण एकदम बारीक चिरून
१ टेस्पून आले पेस्ट
१ टेस्पून कांदा (अगदी बारीक चिरलेला) / किंवा पाती कांदा सुद्धा वापरू शकतो.
१/२ टेस्पून कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च
१ टेस्पून व्हिनेगर (ब्राऊन किंवा व्हाईट)
साखर आणि मीठ चवीनुसार
३ टेस्पून तेल

कृती :
१)१ कप पाणी चांगले उकळावे. त्यात सुकया मिरच्या तुकडे करून घालाव्यात. ३ ते ४ तासांनी किंवा मिरच्या नरम झाल्यावर त्यातले पाणी कढुन टाकावे. मिरच्यांची मिक्सरवर पेस्ट करावी.
२)तेल गरम करावे. त्यात लसूण, कांदा, आले मध्यम आचेवर परतून घ्यावे. मिरची पेस्ट घालावी.व्हिनेगर आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून घ्यावे. तेल सुटायला लागल्यावर त्यात व्हिनेगर-कॉर्न फ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालावे. चांगल्याप्रकारे परतावे.
३)सगळ्यात शेवटी साखर घालावी. साखर लागली कडेला की गॅस बंद करावा.


veg
Share:

दाबेली - Dabeli


दाबेली

साहित्य:
लादी पाव ६-८ (पावभाजीचे पाव)
२ मध्यम उकडलेले बटाटे
३/४ कप डाळिंबाचे दाणे
१० ते १२ द्राक्षं
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप रोस्टेड शेंगदाणे
बारीक शेव (ऑप्शनल)
१ टेस्पून पावभाजी मसाला
१/२ टिस्पून चाट मसाला
२ टिस्पून तेल
मीठ चवीनुसार
बटर
कृती:
१) सर्वात आधी दोन्ही चटण्या तयार करून घ्याव्यात.
२) बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा. प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.
३) उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ टेस्पून पावभाजी मसाला घालावा. किसलेले बटाटे घालावे. मीठ घालावे. एकजीव करून घ्यावे.
४) एका मध्यम खोलगट ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली द्राक्षं, डाळींब आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे. थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
५) आपण वडापाव बनवताना पावाला तीन बाजूंनी चिर देतो तसे दाबेलीला लगतच्या दोन बाजूंना चिर द्यावी. त्यात चिंचगूळाची चटणी, हिरवी चटणी लावावी त्यात बटाट्याचे सारण घालावे. अजून हवे असल्यास थोडे डाळींबाचे दाणे, रोस्टेड शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.
तव्यावर १/२ टिस्पून बटर घालावे त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी. हवी असल्यास शेव लावावी. गरम गरम खावे.


snacks
Share:

दहीवडे - Dahi Vada


दहीवडे - Dahi Vada

साहित्य:
१/२ कप उडदाची डाळ
१/४ कप मुगाची डाळ
मीठ चवीप्रमाणे
दह्याचे १ १/२ कप पात्तळ ताक
१ १/२ कप घट्ट दही
साखर २ ते ३ टीस्पून
मीठ १/२ ते ३/४ टीस्पून
१/२ टीस्पून आले पेस्ट/ किसलेले आले
१ टेबलस्पून धने-जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेची गोड चटणी (आवडीप्रमाणे)
कृती:
१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेल्या डाळी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. मीठ घालून ढवळून घ्या. मिश्रणात गरज वाटली तर अगदी किंचित (१ ते २ चमचे) पाणी घाला.
२. एकीकडे दह्याचे पात्तळ ताक करून घ्या.
३. घट्ट दही घोटून घ्या. त्यात मीठ साखर आणि आल्याची पेस्ट घाला. अगदी थोडेसे पाणी घालून थोडेसे पात्तळ करून घ्या. दही फ्रीज मध्ये ठेवून द्या.
४. कढईत तेल गरम करा. एका पातेल्यात गार पाणी घालून ठेवा.मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम आकाराचे वडे तळून घ्या वड्यांचा आकार खूप मोठा ठेवू नका.
५. तळलेले वडे लगेचच गार पाण्यात घाला. ३-४ च्या बॅच मध्ये वडे तळून घ्या. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आधीचे वडे पाण्यातच ठेवा.पाण्यात भिजल्यावर वड्याचा रंग फिक्कट होईल आणि वडे थोडेसे फुगून आकार मोठा होईल.वडे पाण्यातून काढताना किंचित पिळून पाणी काढून टाका आणि मग हे वडे ताकात भिजत घाला.
६. साधारण तास-दोन तास वडे ताकात भिजत फ्रीज मध्ये ठेवा.
७. सर्व्ह करताना, बाऊलमध्ये ताकातले वडे ठेवा. वरती घोटून ठेवलेले दही घाला. त्यावर धने-जिरेपूड, लाल तिखट चिमटीने घाला. आवडत असल्यास चिंचेची गोड चटणी घाला.कोथिंबीर घालून थंडगार दहीवडे सर्व्ह करा.

sweet dish
Share:

बाकरवडी - Bakarwadi


बाकरवडी 
साहित्य:
२ कप मैदा
२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)
चवीपुरते मीठ
१ ते दिड चमचा तेल
१ छोटा चमचा ओवा
सारणासाठी:
१ मोठा चमचा बेसन
१ छोटा चमचा तीळ आणि खसखस
१ छोटा चमचा आले किसून
१ ते दिड चमचा लसूण पेस्ट
३ चमचे लाल तिखट
१ ते दिड चमचा पिठी साखर
१ छोटा चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पूड
१ छोटा चमचा बडिशेप
१ चमचा किसलेले खोबरे (सुके खोबरे)
३-४ मोठे चमचे बारीक शेव
मीठ
कृती
मैद्याची पोळी:
मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा.तेल गरम करून पीठात घालावे. आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.
सारण:
१) सर्व प्रथम तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.
२) सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.
बाकरवडी:
१) सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.)
२) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे.
३) गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.
४) बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

Ocassional
Share:

मसाला डोसा - Masala Dosa


मसाला डोसा - Masala Dosa
साहित्य :
डोसा
१ कप उडीद डाळ
अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ
१/२ कप चणा डाळ
१/२ टिस्पून मेथीदाणे
चवीपुरते मीठ
मसाला
२ उकडलेले मोठे बटाटे
१ मध्यम कांदा, उभा तापळ चिरून
१ टिस्पून उडीद डाळ
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद

कृती:
डोसा
१) उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून, ६-७ तास पाण्यात भिजत ठेवावे. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ भिजवावी.
२) नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटताना त्यात १ टिस्पून साखर आणि १ टिस्पून मिठ घालावे. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करू नये. मिश्रण चांगले मिळून आले पाहिजे.
३) वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. याच पिठाच्या इडल्याही करता येतील. म्हणून मिश्रण घट्टसरच ठेवावे. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठातील थोडे पिठ दुसर्‍या भांड्यात काढावे आणि किंचीत पाणी घालून पातळ करावे.
४) डोसे घालण्यासाठी नॉनस्टीक तवा वापरावा. आमटी वाढायच्या पळीने डोसे नीट घालता येतात.
मसाला/ बटाटा भाजी
१) शिजलेले बटाटे अगदी बारीक चिरून घ्यावे. कांदा बारीक उभा चिरून घ्यावा.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा.
३) मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
डोसे गरमागरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) आधी भाजी करून मग डोसे करावेत.
२) डोसे बनवताना तव्यावर तेल नसावे. जर डोसा-पिठ पसरवायच्या आधीच तेल घातले तर पिठ व्यवस्थित तव्यावर पसरत नाही. अशावेळी आधी डोसा पिठ घालून व्यवस्थित पातळ पसरवून घ्यावे. थोडा ब्राऊन रंग दिसला कि मग कडेने तेल सोडावे.
३) डोश्याला आतमध्ये थोडा शेजवान सॉस लावला तर मस्त टेस्ट येते.
४) मेथी दाण्यांमुळे फ्लेवर चांगला येतो. तसेच चणाडाळीमुळे थोडा कुरकूरीतपणा आणि किंचीत पिवळसर रंग येतो.
५) साखरेमुळे पिठ आंबण्याची क्रिया चांगली होते.
६) डोशाचे पिठ आंबण्यासाठी , पिठ बारीक करून उबदार जागी ठेवावे. थंड प्रदेशात डोशाचे पिठ आंबत नाही त्यामुळे ओव्हन २ ते ३ मिनीटे २७५ डीग्री Fahrenheit (१३५ डीग्री Celsius) वर प्रिहीट करावा. २ ते ३ मिनीटांनंतर ओव्हन बंद (स्विच ऑफ) करावा, तसेच जास्तवेळ गरम करू नये. आणि भिजवलेले पिठ झाकण ठेवून ओव्हनमध्ये साधारण १० तास ठेवावे. पिठ आत टाकल्यावर ओव्हनचे दार उघडू नये.

नारळाची चटणी - Coconut Chutney
साहित्य:
१ कप ताजा खवलेला नारळ
१/४ कप चण्याचं डाळं
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून साखर
१ हिरवी मिरची
फोडणीसाठी
१/२ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/२ टिस्पून उडीद डाळ
१/८ टिस्पून हिंग
५ ते ७ कढीपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
१/८ आले पेस्ट
कृती:
१) नारळ, डाळं, हिरवी मिरची, मिठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात गरजेपुरते पाणी घालून एकजीव वाटून घ्या. हे मिश्रण एका लहान वाडग्यात काढावे.
२) कढले गरम करून त्यात तेल घालावे. तेल तापले कि त्यात मोहोरी आणि उडीद डाळ घाला. उडीद डाळ लालसर झाली कि हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, आणि आलेपेस्ट घालून फोडणी करून घ्या. हे मिश्रण नारळाच्या मिश्रणावर घाला. मिक्स करून हि चटणी इडली, मेदू वडा, मसाला डोसा, उत्तपा, आप्पे आणि इतर दाक्षिणात्य पदार्थांबरोबर सर्व्ह करा. 

snacks
Share:

पनीर बिर्याणी - Paneer Biryani



पनीर बिर्याणी

साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
३-४ वेलची, ३-४ तमालपत्र, ३-४ लवंगा, १ लहान दालचिनीची काडी
चवीपुरते मिठ
पनीर मॅरीनेशन
२५० ग्राम पनीर, १/२ कप दही, १ टिस्पून आलेलसूण पेस्ट, १/४ टिस्पून मिठ
ग्रेव्ही
१ कप कांदा, उभा पातळ चिरून
५ टोमॅटो, २ टिस्पून आलेलसूण पेस्ट, २ टिस्पून तूप
खडा गरम मसाला - २ वेलची, ३-४ लवंगा, ३-४ मिरीदाणे, २-३ तमालपत्र
१ टिस्पून धणेपूड, १ टिस्पून जिरेपूड, १ टिस्पून गरम मसाला, १/२ टिस्पून लाल तिखट
१ कप मिल्क पावडर (किंवा १/२ कप क्रिम) (टीप ५)
चवीपुरते मिठ
साधारण पाऊण ते एक कप भाज्यांचे तुकडे :- मटार + गाजर लहान तुकडे + फरसबी तुकडे
इतर साहित्य
४ टेस्पून तूप + अजून तूप ऐच्छिक, १ कप कांद्याचे पातळ उभे काप, ८ ते १० काजूबी, ८ ते १० बेदाणे, १/४ कप पुदीना बारीक चिरून, १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून, २ टिस्पून दूध + ३ ते ४ केशराच्या काड्या (टीप ६)

कृती:
पनीर
दही फेटून घ्यावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मिठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे.
भात
१) तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. पातेल्यात ६ कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मिठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात साधारण ६० ते ७० % शिजला कि चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून टाकावे. तयार भात परातीत मोकळा करून गार होण्यास ठेवावा.
ग्रेव्ही
१) पाणी उकळवावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनीटांनी गार पाण्यात सोडावे. सालं सुटली कि काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात.
२) कढईत २ टिस्पून तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतावे. लाल तिखट घालावे.
३) हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी.
४) कढईत साधारण २ टेस्पून तूप गरम करावे. यामध्ये काजूबी आणि बेदाणे परतून बाजूला काढून ठेवावे. याच तुपात हि प्युरी परत कढईत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी. त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर घालावी. भाज्या घालाव्यात. निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे. चवीपुरते मिठ घालावे. हि ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी (टीप १). ग्रेव्ही दाटसर होत आली कि पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी.
तळलेला कांदा
तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ कप) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा.
बिर्याणी (टीप २, ३, ४)
एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली कि भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान भाग करून घ्यावे. एका खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये पहिले तूप सोडावे आणि पसरवून घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू, बेदाणे घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला कि त्यावर तळलेला कांदा, उरलेले काजू बेदाणे आणि दूधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा नये. एकदम मंद आचेवर १५ ते २० मिनीटे वाफ काढावी. गरम गरम बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह करावी.

veg
Share:

ब्लॉग संग्रहण

Blogger द्वारे प्रायोजित.

लेबल

अळू वडे मराठी रेसिपी - Alu vade Recipe in Marathi उकडीचे मोदक रेसिपी मराठी - Ukadiche Modak Recipe in Marathi उपमा मराठी रेसिपी - Upma Recipes in Marathi कांदा भजी मराठी रेसिपी - Kanda Bhaji Recipe in Marathi केळ फुलाची भाजी मराठी रेसिपी - Kel Fhulachi Bhaji Recipe in Marathi कोंबडी वडे मराठी रेसिपी - Kombadi Vade Recipe in Marathi कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मराठी रेसिपी - Kolhapuri Tambda Pandhara Recipe in Marathi खजूराची वडी मराठी रेसिपी - Khajur Vadi Recipe in Marathi गुलाबजाम मराठी रेसिपी - Gulabjam Recipe in Marathi चण्याची उसळ आणि पाव मराठी रेसिपी - Usal Pav Recipe in Marathi चायनिस भेळ मराठी रेसिपी - Chinese Bhel Recipe in Marathi चिकन करी मराठी रेसिपी - Chicken Curry Recipe in Marathi टोमॅटोची भाजी मलाई मराठी रेसिपी - Tomato Bhaji Recipe in Marathi डाळ वडा मराठी रेसिपी - Dal Vada Recipe in Marathi तंदुरी चिकन मराठी रेसिपी - Tandoori Chicken Recipe in Marathi तवा पुलाव मराठी रेसिपी - Tava Pulav Recipe in Marathi तळलेला हलवा मराठी रेसिपी - Halwa Fry Recipe in Marathi तांदळाची भाकरी मराठी रेसिपी - Tandalachi Bhakri Recipe in Marathi ताक मराठी रेसिपी - Taak Recipe in Marathi तिसऱ्या मसाला मराठी रेसिपी - Tisarya Masala Recipe in Marathi दही वडा मराठी रेसिपी - Dahiwada Recipe in Marathi दाबेली मराठी रेसिपी - Dabeli Recipe in Marathi दाल तडका मराठी रेसिपी - Dal Tadka Recipe in Marathi दुधी हलवा मराठी रेसिपी - Dudhi Halwa Recipe in Marathi नानकटाई मराठी रेसिपी - NanKatai Recipe in Marathi नारळाची चटणी मराठी रेसिपी - Naral Chatni Recipe in Marathi नारळी भात मराठी रेसिपी - Narali Bhat Recipe in Marathi पनीर बिर्याणी मराठी रेसिपी - Paneer Biryani Recipe in Marathi पनीर भुर्जी मराठी रेसिपी - Paneer Bhurji Recipe in Marathi पातोळ्या मराठी रेसिपी - Patolya Recipe in Marathi पावभाजी मराठी रेसिपी - Pavbhaji Recipe in Marathi पुरणपोळी मराठी रेसिपी - PuranPoli Recipe in Marathi फणस भाजी मराठी रेसिपी - Fhanas Bhaji Recipe in Marathi फिरनी मराठी रेसिपी - Firni Recipe in Marathi बटाटा भजी मराठी रेसिपी - Batata Bhaji Recipe in Marathi बटाटा वडा मराठी रेसिपी - Batata Vada Recipes in Marathi बदाम कुल्फी मराठी रेसिपी - Badam Kulfi Recipe in Marathi बांगडा फ्राय मराठी रेसिपी - Bangda Fry Recipe in Marathi बाकरवडी मराठी रेसिपी - Bakarwadi Recipe in Marathi बासुंदी मराठी रेसिपी - Basundi Recipe in Marathi बेसन भोपळी मिरची मराठी रेसिपी - Besan Bhopli Mirchi Recipe in Marathi बोंबील फ्राय मराठी रेसिपी - Bombil Fry Recipe in Marathi भरलेलं पापलेट मराठी रेसिपी - Bharlela Paplet Recipe in Marathi भरलेली कारली मराठी रेसिपी - Bharleli Karli Recipe in Marathi भरलेली वांगी मराठी रेसिपी - Bharlela Wanga Recipe in Marathi मश्रुम मसाला मराठी रेसिपी - Mashroom Masala Recipe in Marathi मसाला डोसा मराठी रेसिपी - Masala Dosa Recipe in Marathi मसाले भात मराठी रेसिपी - Masale Bhat Recipe in Marathi मांदेली फ्राय मराठी रेसिपी - Mandeli Fry Recipe in Marathi मिरचीचा खरडा रेसिपी मराठी - Mirchicha Kharda Recipe in Marathi मिरचीचे लोणचे रेसिपी मराठी - Green Chilly Pickle Recipe in Marathi मूग भजी मराठी रेसिपी - Moogbhaji Recipe in Marathi मेथी मटार मलाई मराठी रेसिपी - Methi Matter Malai Recipe in Marathi रसमलाई मराठी रेसिपी - Ras Malai Recipe in Marathi लस्सी मराठी रेसिपी - Lassi Recipe in Marathi वांग्याची भजी मराठी रेसिपी - Wangyachi Bhaji Recipe in Marathi शेंगदाण्याची सोलापुरी चटणी रेसिपी मराठी - Solapuri Shengdana Chutney Recipe in Marathi शेजवान सॉस मराठी रेसिपी - Schezwan Sauce Recipe in Marathi शेवयांची खीर मराठी रेसिपी - Shevya Kheer Recipe in Marathi साबुदाणा वडा मराठी रेसिपी - Sabudana Vada Recipe in Marathi सावजी मटन (स्पेशल नागपुर) मराठी रेसिपी - Savji Mutton Recipes in marathi सुका जवळा मराठी रेसिपी - Suka Javla Recipe in Marathi सुके मटण मराठी रेसिपी - Suka Mutton Recipe in Marathi सुरणाचे काप मराठी रेसिपी - Surnache Kap Recipe in Marathi सोलकढी मराठी रेसिपी - Solkadhi Recipe in Marathi

Categoriess

अळू वडे मराठी रेसिपी - Alu vade Recipe in Marathi उकडीचे मोदक रेसिपी मराठी - Ukadiche Modak Recipe in Marathi उपमा मराठी रेसिपी - Upma Recipes in Marathi कांदा भजी मराठी रेसिपी - Kanda Bhaji Recipe in Marathi केळ फुलाची भाजी मराठी रेसिपी - Kel Fhulachi Bhaji Recipe in Marathi कोंबडी वडे मराठी रेसिपी - Kombadi Vade Recipe in Marathi कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मराठी रेसिपी - Kolhapuri Tambda Pandhara Recipe in Marathi खजूराची वडी मराठी रेसिपी - Khajur Vadi Recipe in Marathi गुलाबजाम मराठी रेसिपी - Gulabjam Recipe in Marathi चण्याची उसळ आणि पाव मराठी रेसिपी - Usal Pav Recipe in Marathi चायनिस भेळ मराठी रेसिपी - Chinese Bhel Recipe in Marathi चिकन करी मराठी रेसिपी - Chicken Curry Recipe in Marathi टोमॅटोची भाजी मलाई मराठी रेसिपी - Tomato Bhaji Recipe in Marathi डाळ वडा मराठी रेसिपी - Dal Vada Recipe in Marathi तंदुरी चिकन मराठी रेसिपी - Tandoori Chicken Recipe in Marathi तळलेला हलवा मराठी रेसिपी - Halwa Fry Recipe in Marathi तवा पुलाव मराठी रेसिपी - Tava Pulav Recipe in Marathi तांदळाची भाकरी मराठी रेसिपी - Tandalachi Bhakri Recipe in Marathi ताक मराठी रेसिपी - Taak Recipe in Marathi तिसऱ्या मसाला मराठी रेसिपी - Tisarya Masala Recipe in Marathi दही वडा मराठी रेसिपी - Dahiwada Recipe in Marathi दाबेली मराठी रेसिपी - Dabeli Recipe in Marathi दाल तडका मराठी रेसिपी - Dal Tadka Recipe in Marathi दुधी हलवा मराठी रेसिपी - Dudhi Halwa Recipe in Marathi नानकटाई मराठी रेसिपी - NanKatai Recipe in Marathi नारळाची चटणी मराठी रेसिपी - Naral Chatni Recipe in Marathi नारळी भात मराठी रेसिपी - Narali Bhat Recipe in Marathi पनीर बिर्याणी मराठी रेसिपी - Paneer Biryani Recipe in Marathi पनीर भुर्जी मराठी रेसिपी - Paneer Bhurji Recipe in Marathi पातोळ्या मराठी रेसिपी - Patolya Recipe in Marathi पावभाजी मराठी रेसिपी - Pavbhaji Recipe in Marathi पुरणपोळी मराठी रेसिपी - PuranPoli Recipe in Marathi फणस भाजी मराठी रेसिपी - Fhanas Bhaji Recipe in Marathi फिरनी मराठी रेसिपी - Firni Recipe in Marathi बटाटा भजी मराठी रेसिपी - Batata Bhaji Recipe in Marathi बटाटा वडा मराठी रेसिपी - Batata Vada Recipes in Marathi बदाम कुल्फी मराठी रेसिपी - Badam Kulfi Recipe in Marathi बांगडा फ्राय मराठी रेसिपी - Bangda Fry Recipe in Marathi बाकरवडी मराठी रेसिपी - Bakarwadi Recipe in Marathi बासुंदी मराठी रेसिपी - Basundi Recipe in Marathi बेसन भोपळी मिरची मराठी रेसिपी - Besan Bhopli Mirchi Recipe in Marathi बोंबील फ्राय मराठी रेसिपी - Bombil Fry Recipe in Marathi भरलेलं पापलेट मराठी रेसिपी - Bharlela Paplet Recipe in Marathi भरलेली कारली मराठी रेसिपी - Bharleli Karli Recipe in Marathi भरलेली वांगी मराठी रेसिपी - Bharlela Wanga Recipe in Marathi मश्रुम मसाला मराठी रेसिपी - Mashroom Masala Recipe in Marathi मसाला डोसा मराठी रेसिपी - Masala Dosa Recipe in Marathi मसाले भात मराठी रेसिपी - Masale Bhat Recipe in Marathi मांदेली फ्राय मराठी रेसिपी - Mandeli Fry Recipe in Marathi मिरचीचा खरडा रेसिपी मराठी - Mirchicha Kharda Recipe in Marathi मिरचीचे लोणचे रेसिपी मराठी - Green Chilly Pickle Recipe in Marathi मूग भजी मराठी रेसिपी - Moogbhaji Recipe in Marathi मेथी मटार मलाई मराठी रेसिपी - Methi Matter Malai Recipe in Marathi रसमलाई मराठी रेसिपी - Ras Malai Recipe in Marathi लस्सी मराठी रेसिपी - Lassi Recipe in Marathi वांग्याची भजी मराठी रेसिपी - Wangyachi Bhaji Recipe in Marathi शेंगदाण्याची सोलापुरी चटणी रेसिपी मराठी - Solapuri Shengdana Chutney Recipe in Marathi शेजवान सॉस मराठी रेसिपी - Schezwan Sauce Recipe in Marathi शेवयांची खीर मराठी रेसिपी - Shevya Kheer Recipe in Marathi साबुदाणा वडा मराठी रेसिपी - Sabudana Vada Recipe in Marathi सावजी मटन (स्पेशल नागपुर) मराठी रेसिपी - Savji Mutton Recipes in marathi सुका जवळा मराठी रेसिपी - Suka Javla Recipe in Marathi सुके मटण मराठी रेसिपी - Suka Mutton Recipe in Marathi सुरणाचे काप मराठी रेसिपी - Surnache Kap Recipe in Marathi सोलकढी मराठी रेसिपी - Solkadhi Recipe in Marathi

योगदानकर्ते

लेबल

ब्लॉग संग्रहण

Recent Posts

Unordered List

पेज

Theme Support