कोंबडी वडे (मालवणी)
साहित्यः-
एक किलो चिकन्
तीन मोठे बारीक चिरलेले कांदे.
एक मोठी वाटी लसूण.
अर्धी वाटी चिरलेले आलं.
मीठ.
दोन चमचे हळद.
एक वाटी मालवणी मसाला.
एक चमचा धणे.
४-५ लवंग.
८-९ काळी मिरी.
एक मध्यम उभा चिरलेला कांदा.
तेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले.
कृती :-
प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट
करत ठेवावे.भांड्यात तेल घालून तापले की त्यात बारीक चिरलेला कांदाघालून मऊ होईपर्यंत परतावा. नंतर
त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे.त्यातच मालवणी मसाला घालून चांगले परतावे.पाणी घालून चांगले शिजू
द्यावे.कढईत थोडे तेल घलून त्यात प्रथम धणे,लवंग्व मिरी परतून घ्यावे त्यातच उभा चिरलेला कांदा लालसर
होईपर्यंत परतावा.नंतर त्यात खवलेले खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.
चिकन शिजले की त्यात हा वाटलेला खोबर्याचा मसाला घालावा.पाहिजे तेव्हडे पातळ करून चांगली उकळी
येऊ द्यावी.त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.सर्व्ह करतांना वरून सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालावी.
मालवणी वड्या बरोबर खावे
*वडे*
साहित्य:
१ किलो जाडे तांदुळ
पाव वाटी उडीद डाळ
१ चमचा धणे
१ चमचा मेथी
चविपुरते मिठ
तेल
पिठ तयार करण्यासाठी:
तांदुळ धुवुन वाळवावेत. त्यात उडीदडाळ, धणे, मेथी कोरडी भाजून घालावी व पिठ दळून आणावे.
कृती:
लागेल तेवढे पिठ ताटात किंवा परातीत घेउन त्यावर गरम पाणी (साधारण पिठाएवढेच पाणी लागते) टाकुन झाकण देउन ठेवावे. मग थोड्यावेळाने थंड झाले की त्यावर मिठ टाकुन मळून घ्यावे.
हे मळलेले पिठ एका स्वच्छ फडक्यात बांधून गुंडाळून ठेवायचे.
प्लास्टीकची जाडसर पिशवी घेउन त्यावर त्यावर छोटा गोळा घ्यावा. एकीकडे तेल तापत ठेवायचे आधी.
आता हे गोळे चपटे करायचे.
पाहीजे असल्यास मध्ये होल द्यायचे.
आता तेलात सोडा व गोल्डन कलर होई पर्यंत तळून काढा
non-v